बहुगुणी डेस्क, वणी: सोमवार दिनांक ३० जुनच्या मध्यरात्री शहरात तीन ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या. त्यातील एम.आय.डी.सी. परिसरातील एक चोरीही महत्त्वाची होती. यात चोरट्याने गजानन फर्निशर्स हे दुकान फोडले होते. दुकानातील वस्तू व साहित्य त्या चोरट्याने लंपास केले. त्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अवघ्या काही तासांतच अटक केली.
त्याच्या जवळून पथकाने 18 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. वणीत्ल्या खडबडा मोहल्ल्यात राहणारा शेख सलीम शेख इस्माईल (49) असे एलसीबी पथकाने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी परिसरातील गजानन फर्निचर या दुकानात ३० जूनच्या रात्री चोरी झाली. चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील वस्तू व साहित्य लंपास केले. 1 जुलैला सकाळी ९.०० वाजता ही चोरीची घटना उघडकीस आली.
दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकान मालक अनिकेत गजानन गहुकर (25) यांनी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. तक्रार दाखल होताच एलसीबी पथकाने तपासचक्रे गतीने फिरवलीत. खबऱ्यांना अलर्ट केले. या चोरी प्रकरणाचा छडा लावला. दुकान फोडणाऱ्या शेख सलीम शेख इस्माईल याच्या मुसक्या आवळून त्याने चोरी केलेला मुद्देमाल एलसीबी पथकाने जप्त केला.
त्याच्या जवळून पथकाने 8 हजार रूपये किमतीची एक वेल्डिंग मशीन, 6 हजार रूपये किमतीचे ग्राइंडर, 4 हजार रूपये किमतीचे स्कू मशीन, आणि 500 रूपये किमतीचा इलेक्ट्रिक बोर्ड असा एकूण 18 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखा पो.नि. सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर, पीएसआय धनराज हाके, पोना सुधीर पांडे, सुनील खंडागळे, सुधीर पिदूरकर, नीलेश निमकर, सलमान शेख, नरेश राऊत यांनी केली.
Comments are closed.