दिलीप उर्फ मोन्टू वाधवानी यांचे दीर्घ आजाराने निधन
आज दुपारी 2 वा. शेतकरी मंदिर जवळील राहत्या घरून अंत्ययात्रा
बहुगुणी डेस्क, वणी: दिलीप उर्फ मोन्टू वाधवानी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते फुफ्फुसाच्या (लंग्ज) कारणाने आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर गेल्या 4 महिन्यांपासून हैदराबाद येथे उपचार सुरू होते. मात्र शनिवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधी कॉलोनीतील सुप्रसिद्ध मोन्टू का धाबा या रेस्टॉरन्टचे ते संचालक होते. एक सुस्वभावी आणि सर्वांच्या मनात आपलेपणाने स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची परिसरात ओळख होती. एक कडवड शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते अशी देखील त्यांची ओळख होती. ते नेहमी सामाजिक व धार्मिक कार्यात हिरारीने सहभाग घ्यायचे.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी वणीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अंत्ययात्रा दुपारी 2 वाजता शेतकरी मंदिर समोर, त्यांचे राहते घर येथून निघणार आहे. त्यांच्या जाण्याची वार्ता वणीत पोहचताच वणीत हळहळ व्यक्त केली जात आहे. मोन्टू वाधवानी यांना वणी बहुगुणी कडून भावपूर्ण आदरांजली.
Comments are closed.