वणीमध्ये भव्य मुख कर्करोग निदान निःशुल्क शिबिराचे आयोजन

नोंदणी आवश्यक, रविवारी 17 ऑगस्ट रोजी शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लायन्स क्लब वणी आणि वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, देशमुखवाडी, वणी येथे ‘मोफत भव्य मुख कर्करोग निदान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी वणी शहर व परिसरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार लायन संजीव रेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन तुषार नरेंद्र नगरवाला, सचिव लायन प्रा. डॉ. अभिजित अणे आणि प्रकल्प संचालक लायन डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

या शिबिरात नागपूरचे प्रसिद्ध ओरल कॅन्सर तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर बांडे, चंद्रपूरचे मान्यवर ओरल सर्जन डॉ. विजय उराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. विजय राठोड, डॉ. रेशम शुगवानी आणि डॉ. रिषभ राठोड हेही सहभागी होणार आहेत. शिबिर रविवारी सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत चालणार आहे.

शिबिरात तोंडात फोड येणे, तोंड न उघडणे, पांढरे/लाल डाग, तोंडात/मानेत गाठ, तोंड/जीभ/टॉन्सिल्समधून रक्तस्त्राव, तंबाखू/गुटखा/खर्रा सेवनाने होणारी हानी, तोंडाच्या कर्करोगानंतर उघडण्यास अडचण किंवा गिळण्यास त्रास अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी निदानासाठी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी नोंदणी करण्यासाठी 9822551113, 9822461145 आणि 9881487429 या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती आयोजकांनी दिली.

Comments are closed.