अपघातात प्रध्यापकाचा जागीच मृत्यू
वणी/विवेक तोटेवार: बुधवारी दुपारी 1.45 ते 2.30 च्या दरम्यान वरोरा रोडवर झालेल्या अपघातात वरोरा येथील महाविद्यालयातील प्राध्यापकाचा मृत्यू झाला. यावेळी प्राध्यापक हे वरोरा येथून कॉलेज वरून येत होते. त्याचवेळी पांढरकवडा येथून येणाऱ्या महामंडळाच्या बसची जोरदार धडक बसली यात प्रध्यापक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, वरोरा येथील महाविद्यालयात अनिल अर्जुन नन्नावारे (42) राहणार प्रगतीनगर, वणी हे भौतिकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य बजाऊन वणी येथे आपल्या दुचाकीने परत येत होते. त्याच वेळी पांढरकवडा आगाराची बस (एम एच 40 वाय 5386) ही पांढरकवडा वरून चंद्रपूरला जात होती. यावेळी सार्वला या ठिकाणी अनिल यांची दुचाकी (एम एच 34 वाय 9045) व बस यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत अनिल यांच्या डोक्याला, उजव्या खांद्याला व उजव्या पायाला मार लागला. डोक्याची इजा गंभीर असल्याने अनिल यांचा जागीच मृत्यू झाला.
अनिल यांचा मृतदेह वणी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. त्याचे शवविच्छेदन डॉ भालचंद्र आवारी यांनी केले. त्यानंतर अनिलच्या पार्थिव शरीर त्यांच्या कुटूंबियांच्या सुपूर्द करण्यात आले. अनिलच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आईवडील असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्राध्यापक असल्याची माहिती आहे. या घटनेत चालक प्रमोद गोविंदराव गेडाम व वाहक राजेश बाबूराव चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा प्राथमिक तपास पो हे कॉ अनंत इरपाते करीत आहेत. अनिलच्या आकस्मिक मृत्यूने सर्व प्रध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी व शेजाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेत चुकी कुणाची हिती हे अजूनही स्पस्ट झाले नाही आहे. प्रा अनिल हे वणीचे नाही तर राहणार हरणी तालुका चिमूर येथील रहिवासी होते. ते वणी येथी किरायच्या घरात राहत होते. वरोरा येथून परत आल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे कार्यक्रमासाठी पत्नी मुलांसोबत जाणार होते. अशी माहिती त्यांच्या आप्तसंबंधीयकडून मिळाली आहे.