मुकूटबन येथे महावीर जयंती उत्साहात साजरी
सुशील ओझा, झरी: जैन धर्माचे 24वे व शेवटचे तिर्थकर भगवान महावीर स्वामी यांचे जन्म कल्याणक महोत्सव “महावीर जयंती” मुकुटबन येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
मुकुटबन येथील नवनिर्मित जैन स्थानकामध्ये सकाळी 9.00 ते 11.00 वाजे पर्यंत सामूहिक नवकार मंत्राचे जप व त्यानंतर जैन बंधू व भगिनींनी जैन भक्तीगीत व स्तवन गायन केले. श्रीमती मोहिनीदेवी कोठारी यांनी केलेले मंगलपाठ सोबतच कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमानंतर उपस्थित समाज बांधवांसाठी गौतम प्रसादी (स्नेह भोजन) चे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मुकुटबनमध्ये पहिल्यांदा आयोजित महावीर जयंती कार्यक्रमासाठी समाज बांधवांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाले. कार्यक्रमाचे संचालन विमल जैन यांनी तर आभार नरेंद्र कोठारी यांनी मानले .
महावीर जयंती कार्यक्रमात मुकुटबन, अडेगाव व वणी येथील जैन समाजातील चांदमल तातेड, चंद्रभान तातेड, पारसमल आबड , इंदरचंद आबड, कोमलचंद लोढा, पुखराज सुराणा, उत्तमचंद कोठारी, प्रकाशचंद कोठारी, जितेंद्र कोठारी, अनिल कोठारी, शांतीलाल कोठारी, दिनेश सुराणा, अनिल प्रेमराज कोठारी, गणपतलाल तातेड, दिपचंद तातेड, सह शेकडो समाज बांधव नवयुवक व महिलांची उपस्थिती होती.
महावीर जयंती कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्थानाकवासी जैन श्रावक संघ मुकुटबनचे अध्यक्ष विजय कोठारी, उपाध्यक्ष महेंद्र आबड, कोषाध्यक्ष नरेंद्र कोठारी व सचिव सुरेंद्र तातेड यांनी अथक प्रयत्न केले. समाजातील वरिष्ठ नागरिकांकडून यावेळी स्थानाकवासी जैन श्रावक संघ मुकुटबनचे पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.