मोमिनपुरा येथे शनिवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

11 वा. शिबिराला सुरुवात, गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनचा उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF) च्या वतीने 30 ऑगस्ट रोजी वणीतील मोमिनपुरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा मुख्य उद्देश समाजात रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे आणि गरजू रुग्णांना वेळेत सुरक्षित रक्त उपलब्ध करून देणे हा आहे. याशिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिर शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. 18 ते 60 वर्षे वयोगटातील निरोगी पुरुष या शिबिरात रक्तदान करू शकतात. रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना संस्थेकडून प्रमाणपत्र आणि आरोग्य तपासणी अहवाल देण्यात येणार आहे. गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF) च्या वतीने सर्व नागरिकांना या पुण्य कार्यात सहभागी होऊन जीव वाचवण्याच्या मोहिमेत हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रक्तदानासाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले नाव नोंदवण्यासाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा शोएब चिनी मोबाईल नं. 8668566167 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

Comments are closed.