ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने दारू दुकाने बंद ठेवण्याची मागणी
AIMIM ने दिले उपविभागीय अधिका-यांना निवेदन
बहुगुणी डेस्क, वणी: इस्लाम धर्माचे शांतिदूत आणि शेवटचे पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त “जश्न-ए-ईद मिलादुन्नबी” साजरी करण्यात येते. येत्या 5 सप्टेंबर रोजी हा उत्सव असून या पार्श्वभूमीवर, वणी नगर परिषदेच्या हद्दीतील देशी-विदेशी दारू दुकाने आणि बिअर बार बंद ठेवण्याची मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) वणी शहर कमिटीने केली आहे. याबाबत मंगळवारी एमआयएम तर्फे उपविभागायी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी AIMIM वणी शहर अध्यक्ष आसिम हुसेन, साकिब अहमद खान, तौसीफ खान, सरफराज शेख, रेहान शेख, मोहम्मद वाइस, मोहम्मद सोहेल, शाकिर खान, रिझवान शेख, अरबाज शेख आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. धार्मिक सलोखा राखण्यासाठी प्रशासनाकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा एमआयएमने व्यक्त केली.

Comments are closed.