पोलीस कर्मचारी उमेश डोंगरे यांचे निधन

आज दुपारी 2 वाजता मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: मुकुटबन पोलीस स्टेशनचे कर्मचारी उमेश विठ्ठलराव डोंगरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 43 वर्षांचे होते. ते वणीतील काळे लेआउट येथे राहत होते. रविवारी दिनांक 7 सप्टेंबर सकाळी त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेमुळे पोलीस विभागात शोककळा पसरली आहे. आज सोमवारी दुपारी दोन वाजता मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. उमेश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.