पाटण येथे पेसा अंतर्गत कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा
सुशील ओझा, झरी: राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत तालुक्यातील पेसा गावस्तरीय कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा पंचायत समिती झरी तर्फे २६ ते २८ मार्च २०१८ ला पाटण येथे कार्यशाळा घेण्यात आली. बालाजी मंदिराच्या भवनात ही तीन दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. यात गावस्तरीय संबंधित तलाठी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, वनविभागाचे कर्मचारी, ग्रामपंचयत सरपंच आणि आशा वर्कर यांना झरीजामनीचे एबीडीओ शिवाजी गवई यांनी मार्गदर्शन केले.
शासनाने झरी आदिवासी बहुल तालुक्यातील पेसा अंतर्गत गावस्तरीय गावाच्या विकासाकरिता स्थानिक ग्रामपंचयत ला विशिष्ट निधी दिला जात आहे. हा निधी गावपातळीवर सभा घेऊन गावांच्या विकासात्मक कामावर खर्च करण्यासबंधीत मार्गदर्शन तर गावपातळीवर आदिवासी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. अशा आदेशाची अमंलबजावणी करून आदिवासी समाजातील माणसाला प्रतिनिधित्व करण्याची संधी शासनाने जारी केलेल्या आदेशात देण्यात आली आहे. यातूनच आदिवासी समाजात जनजागृती होईल असे मार्गदर्शनपर प्रशिक्षण तीन दिवशीय कार्यशाळे दरम्यान झरीचे गटविकास अधिकारी शिवाजी गवई यांनी केले.
तालुक्यातील पेसा अंतर्गत आदिवासी गावाला वनसम्पती जसे मोहफुले, डिंक अशा आदी वनसंपत्ती जमा करून मांनवविकासाच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी ग्रामसभेत ठराव घेण्याचा अधिकार असून या द्वारे गरीब आदिवासी नागरिकांना जास्त पैसे मिळविता येईल याचा फायदा गावात आदिवासी कर्मचारी असल्याने समाजाची संस्कृती लोप पावणार नाहीत. पेसा म्हणजे पैसा नाहीत, असे प्रशिक्षण दरम्यान प्रामुख्याने सांगण्यात आले.
या तीन दिवशीय पेसा गावस्तरीय कार्यशाळेत तालुक्यातील ग्रापंचायत सरपंच ,ग्रामसेवक ,आरोग्य कर्मचारी ,शिक्षण विभागातील शिक्षक,तलाठी , कृषिसहायक वनविभागाचे कर्मचारी आणि अशा वर्कर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षण घेतले.