वणीत मुसळधार पाऊस – नदीकाठ खचल्याने भीतीचं सावट

इलेक्ट्रिक पोल 20 फूट खोल खड्यात

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा धडाका सुरू आहे. या पावसामुळे गणेशपूरमधून वाहणाऱ्या निर्गुडा नदीला पूर आला असून, छोरिया ले-आऊट परिसरात भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनामुळे नदीकाठावरील इमारतींना मोठा धोका निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर नदीकाठावरील इलेक्ट्रिक पोल जवळपास 20 फूट खोल खड्यात कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बुधवारी व गुरुवारी दुपारी वणीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे निर्गुडा नदीला पूर आला. त्यामुळे नदीकाठचा भाग खचला. नदीकाठी छोरिया ले आऊट आहे. या ले-आऊटमध्ये विनायक रेसिडेन्सी ही इमारत आहे. नदीकाठची वॉल खचल्याने परिसरातील या बिल्डींगला धोका निर्माण झाला असून परिसरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रशासनाने तातडीने पाहणी करून संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

Comments are closed.