तीन दिवस वणीमध्ये स्पर्धांचा जल्लोष – आजपासून JCI विक

अंताक्षरी, गीतगायन, नृत्य स्पर्धा प्रमुख आकर्षण...

पुरुषोत्तम नवघरे, वणी: JCI वणी सिटी तर्फे आयोजित JCI WEEK-2025 ला आजपासून दणक्यात सुरुवात होणार आहे. 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान शेतकरी मंदिर, वणी तीन दिवस विविध स्पर्धा, उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. प्रिझम-110 या संकल्पनेखाली आणि “Uniting Vision, Creating Change” या घोषवाक्यासह हा उपक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात व स्पर्धेत मोठ्या संख्येने वणीकरांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन जेसीआय तर्फे करण्यात आले आहे.

आज शुक्रवारी दुपारी 4 वाजता उद्घाटन समारंभाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर रांगोळी स्पर्धा, गीतगायन स्पर्धा होणार आहे. रात्री 9:30 वाजता बक्षीस वितरण केले जाणार आहे. शनिवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 8:30 वाजेपर्यंत वेषभूषा स्पर्धा, दुपारी 4 वाजता नृत्य स्पर्धा आणि सायंकाळी 6 वाजता अंताक्षरी स्पर्धा आयोजित आहे. रात्री 9:30 वाजता विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. रविवारी दिनांक 14 सप्टेंबर
दुपारी 12 ते 8 वाजेपर्यंत बुद्धिबळ स्पर्धा, त्यानंतर BGMI स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, तसेच सायंकाळी नृत्य स्पर्धा पार पडणार आहेत. शेवटी रात्री 9:30 बक्षीस वितरण व उत्सवाची सांगता होणार आहे. 

या JCI वीकमध्ये बंपर प्राईझेस, रोख बक्षिसे, शिल्ड व प्रशस्तिपत्र देण्यात येणार असून, स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक व महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमाचा उत्साह वाढवावा असे आवाहन जेसीआयचे अध्यक्ष अभिषेक चौधरी, नमिष काळे, पंकज कासावार, सुमित कुरेवार, संजीव गुप्ता, यश श्रीवास्तव व जेसीआय सदस्यांनी केले आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.