विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सार्वला येथे राहणारा युवक पंकज आवारी (16) हा शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी दुपारी आपली दुचाकी (मोपेड) घेऊन घरून निघून गेला. संध्याकाळपर्यंत तो घरी परतला नाही. शिवाय त्याचा मोबाईल देखील बंद दाखवत होता. त्यामुळे गावकरी रात्रीपासून त्याचा परिसरात शोध घेत होते. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. अखेर आज सकाळी त्याची दुचाकी पाटाळ्या नदीच्या पुलाशेजारी आढळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पंकज हा शिक्षण घेत असून तो सावर्ला येथे त्याच्या कुटुंबीयांसह राहतो. दुपारी पंकज रागाच्या भरात वणीला जातो असे सांगून घरून निघून गेला होता. संध्याकाळी तो घरी न परतल्याने त्याला मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. मात्र त्याचा मोबाईल स्विच्ड ऑफ होता. गावक-यांनी रात्री त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तो आढळला नाही. सकाळी काही गावकरी पाटाळ्याच्या पुलाजवळ गेले असता. वर्धा नदीच्या पुलाच्या दुस-या बाजूला (वरोरा साईड) नदीच्या काठी पंकजची दुचाकी (MH29 CH 4025) आढळून आली. गाडीला चावी लावलेली होती.
पंकजच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठत मिसिंग तक्रार दिली. दरम्यान पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे. या घटनेमुळे गावक-यांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून पंकजचा फोटा व्हायरल करून सदर वर्णनाचा युवक आढळल्यास संपर्क साधावा, असे आवाहन पंकजच्या पालकांनी केले आहे. सध्या पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही चेक करीत आहे. तसेच मोबाईलचे लोकेशन ट्रेस करीत आहे. सदर वर्णनाचा युवक कुणाला आढळल्यास त्याची माहिती वणी पोलीस स्टेशन किंवा त्यांच्या पालकांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.






Comments are closed.