करवाढ व हद्दवाढ मागे घेण्यासाठी शिवसेनेचे निवेदन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार – विश्वास नांदेकर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सामान्य जनतेला न परवडणारी करवाढ नगर परिषदेने मागे घ्यावी या संदर्भात माजी आमदार तसेच यवतमाळ-चंद्रपूर लोकसभा समन्वयक विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात नवीन करवाढ व हद्दवाढ मागे घेण्यासाठी दिनांक 29 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. त्यावेळी नांदेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती दिली.

2025-26 चे कर भरल्या शिवाय आक्षेप घेता येणार नाही, ही अट जाचक आहे. त्यामुळे ही अट मागे घेण्यासाठी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान त्यांनी ही अट मागे घेण्याचे मान्य केले. याशिवाय पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठीही मुख्याधिकारी यांना विश्वास नांदेकर यांनी सूचना केल्या.

निवेदन देताना उपजिल्हाप्रमुख उमेश वैरागडे, उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी उज्वला चंदनखेडे, विधानसभा संघटिका महिला आघाडी संगीता मुरसकर, तालुकाप्रमुख महिला आघाडी मनीषा कोंगरे, महिला आघाडी शहर प्रमुख वसुधा ढगे, तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे, शहर प्रमुख शिवराज पेचे, उपतालुकाप्रमुख धीरज राजूरकर, उपतालुकाप्रमुख अनिल उलमाले, तालुका संघटक नरेंद्र बदखल, उपशहर प्रमुख संतोष लक्षशेट्टीवार, उपशहर प्रमुख प्रवीण पिसे, शहर संघटक अजय नागपुरे, शहर समन्वयक महेश चौधरी, संजय आवारी तसेच आजी-माजी पदाधिकारी आणि सामान्य नागरिक उपस्थित होते.

Comments are closed.