राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई पानघाटे यांचे निधन

आज संध्याकाळी अंत्यसंस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व माजी आमदार स्व. बापूराव पानघाटे यांच्या पत्नी विमलताई बापूराव पानघाटे (वय ८५) यांचे आज दुपारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने वणी तालुका व शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
मितभाषी, मनमिळाऊ आणि समाजकारिणी विमलताईंनी राष्ट्रीय शिक्षण संस्थेद्वारे दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाने हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले. निधनामुळे एक कर्तव्यनिष्ठ व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना सर्वत्र आहे. पश्चात मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. आज सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहे. अंत्ययात्रा राहत्या घरून निघणार आहे.राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई पानघाटे यांचे निधन आज संध्याकाळी अंत्यसंस्कार.

Comments are closed.