गुरूनगर येथील रफिक शेख यांचे अपघाती निधन

गडचिरोलीत बाबा जिलानी दर्शनानंतर परतीच्या प्रवासात ट्रकची धडक

वणी (विवेक तोटेवार) :वणी शहरातील गुरुनगर येथील रहिवासी रफिक शेख (वय ५२) यांचा मंगळवारी रात्री गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. बाबा जिलानी दर्शन घेऊन परतताना मालवाहू ट्रकची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली.

भारतीय सेनेतून निवृत्त झालेले रफिक शेख हे प्लॉट, फ्लॅट, शेतजमीन आणि घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवसाय करीत होते. शहरात त्यांचा चांगला संपर्क होता. दर महिन्याला ते गडचिरोलीतील बाबा जिलानी दर्शनाला जात असत.

मंगळवारी कार क्रमांक MH 29 AR 5853 ने चालकासह दर्शनाला गेले होते. परतीच्या प्रवासात ट्रकची धडक बसल्याने रफिक यांचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी चालकाला रुग्णालयात दाखल केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी आणि शिक्षण घेत असलेला मुलगा असा परिवार आहे. घटनेची बातमी कळताच शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.