छानणीत ‘इतके’ अर्ज झाले बाद, आता किती उरलेत उमेदवार?
जाणून घ्या पात्र ठरलेल्या सर्व प्रभागातील उमेदवारांचे नाव...
बहुगुणी डेस्क, वणी: मंगळवारचा दिवस निमनिर्देशन अर्ज छानणीचा दिवस होता. नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या संपूर्ण कालावधीत नगरसेवक पदासाठी 201 तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 10 नामनिर्देशन अर्ज सादर झाले होते. यातील नगराध्यक्ष पदाचे 2 अर्ज व नगरसेवक पदाकरीता 41 अर्ज बाद झालेत. आता नगराध्यक्ष पदासाठी 8 अर्ज व नगरसेवक पदासाठी 160 अर्ज आहेत. काहींनी पक्षाचे डमी उमेदवार तर काहींनी अपक्ष व पक्षाचे असे दोन्ही फॉर्म भरले. काहींनी एकापेक्षा अधिक फॉर्म भरले होते. त्रुटी असलेले, पक्षाचा एबी फॉर्म न जोडलेले तसेच एकापेक्षा अधिक भरलेले अर्ज बाद करण्यात आले. 1 अ, 3 अ, 5 अ, 9 अ, 13 अ व 14 क या प्रभागात सर्वांत कमी म्हणजे प्रत्येकी केवळ 3 उमेदवार आहेत. तर सर्वाधिक उमेदवार 9 ब आणि 12 ब या प्रभागात प्रत्येकी 9 उमेदवारांचे अर्ज आहेत. उद्या दिनांक 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या काळात उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी तयार होईल. 26 नोव्हेंबर रोजी अपक्षांना चिन्ह वाटप होणार आहे व त्याच दिवसापासून प्रचाराला सुरुवात होणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी पात्र उमेदवार
पुष्पाताई पुंडलीक आत्राम – वंचित बहुजन आघाडी
आत्राम विद्या खेमराज – भाजप
पुष्पा कवडू कुळसंगे – आप
पायल यशवंत तोडसाम – शिवसेना
संचिता विजय नगराळे – शिवसेना (उबाठा)
भारती संतोष पेंदोर – अपक्ष
उमा विठ्ठलराव राजगडकर – अपक्ष
शेख काजल इस्माईल अख्तर – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
प्रभाग क्रमांक 1 अ – वसुधा अनिल ढगे शिवसेना, प्रणाली गणेश देऊळकर शिवसेना (उबाठा), मीनाक्षी शैलेश जुनघरे भाजप
प्रभाग क्रमांक 1 ब – अजय पांडुरंग धोबे शिवसेना (उबाठा), कैलास तुकारामजी बोबडे शिवसेना, उमाकांत महादेव जोगी, प्रशांत सुदाम फाळके आम आदमी पार्टी, नितीन शंकरराव चहाणकर, प्रकाश जनार्धन पिंपळकर अपक्ष,
प्रभाग 2 अ – रिता महेश पहापळे भाजप, मंजुषा मंगशे झाडे शिवसेना, पुष्पा मधूकर भोगेकर अपक्ष, ज्योत्स्ना बालाजी धोटे शिवसेना (उबाठा)
प्रभाग क्रमांक 2 ब – राजू किसन तुराणकर शिवसेना (उ. बा. ठा.), धनराज रमेशराव भोंगळे अपक्ष, वैभव अनिल मांडवकर शिवसेना, आशिष ज्ञानेश्वर डंभारे भाजप
प्रभाग 3 अ – अश्विनी विनोद खापणे शिवसेना (उ. बा .ठा), शुभांगी रविंद्र ठेंगणे शिवसेना, वैशाली विनोद वातीले भाजप
प्रभाग क्रमांक 3 ब – लक्ष्मण महादेव उरकुडे भाजप, जगन पुरुषोत्त्म खंडाळकर शिवसेना, प्रदीप दामोदर सुंकुरवार आम आदमी पार्टी, अभिजित अरुण सातोकर शिवसेना (उ.बा .ठा), अनिकेत अनिल चामाटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)
प्रभाग क्रमांक 4 अ – स्नेहा प्रतिक खैरे शिवसेना, अर्जना संजय पुनवटकर भाजप, मेघा सुधीर पेटकर शिवसेना (उ.बा.ठा), ललिता भाऊराव तेलतुंबडे वंचित बहुजन आघाडी, माधुरी किरण तेलतुंबडे
प्रभाग क्रमांक 4 ब- निलेश मधुकर परगंटीवार शिवसेना, प्रवीण शेषराव ढोके शिवसेना (उबाठा), अनिल नानाजी ताजणे अपक्ष, धीरज गणेश भोयर, राकेश लक्ष्मण बुग्गेवार भाजप, नारायण शाहुजी गोडे आम आदमी पार्टी, सागर अशोकराव मुने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, वसंता विठ्ठल गायकवाड
प्रभाग 5 अ – सोनाली प्रशांत निमकर भाजप, गीता सचिन पडोळे शिवसेना, अर्जना सुभाष ताजणे शिवसेना (उबाठा)
प्रभाग क्रमांक 5 ब – गौतम दिलीप जीवने, रितीक लक्ष्मण मामीडवार भाजप, रामेश्वर शुक्राचार्य लोणारे वंचित बहुजन आघाडी, संदीप मुरलीधर खोब्रागडे शिवसेना, किशोर काशीनाथ गिरडकर आम आदमी पार्टी, कपिल भास्कर मेश्राम अपक्ष,
प्रभाग क्रमांक 6 अ – करुणा रविंद्र कांबळे, प्रणोती हेमंत बांगडे शिवसेना, धम्मदीन हरीष पाते भाजप, शिवसेना, रूपाली नारायणराव लोहकरे वंचित बहुजन आघाडी, प्रिया अनुप काटकर, सुनीता गणेश सोनकर अपक्ष,
प्रभाग क्रमांक 6 ब – मुकुंदा विद्याधर किटकुले, गंगासिंग गुरुदयालसिंग चव्हाण अपक्ष, महेश गंगाधर टिपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, विलास मारोतराव डवरे भाजप, अनिकेत अनिल बदखल शिवसेना (उबाठा), सिद्धार्थ दिलीप मून वंचित बहुजन आघाडी, प्रमोद गोकुळ लोणारे अपक्ष, वर्षा अनिल सातपुते शिवसेना
प्रभाग क्रमांक 7 अ – उषा नथ्थू डुकरे भाजप, प्रीती देवराव बीडकर शिवसेना, पूजा वासुदेव बुरांडे अपक्ष, छाया किशोर मृत्यलवार अपक्ष, शेख सिमरन शेख असिफ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेख रुकसाना परवीन इकबाल राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
प्रभाग 7 ब – अतुल झाबाजी घोटकर अपक्ष, नितीन गोपाल धाबेकर भाजप, सचिन अरुणराव पाटील शिवसेना (उबाठा), दिलीप हरिदास वनकर आम आदमी पार्टी, जितेंद्र किसनराव शिरभाते, अभिजीत वसंत सोनटक्के काँग्रेस, नीलेश विठ्ठल होले शिवसेना,
प्रभाग 8 अ – प्रमिला मनोज चौधरी भाजप, देवयानी संजय सूर शिवसेना, रुपाली संजय कुरेकार अपक्ष, सारिका पवन सिद्धमशेट्टीवार काँग्रेस
प्रभाग 8 ब – प्रशांत विठ्ठलराव कापसे राष्ट्रवादी शरद पवार, निखिल प्रभाकर डवरे अपक्ष, सुधीर रिमदेव थेरे शिवसेना (उबाठा), सागर मारोती पोडचलवार अपक्ष, कुणाल संजय सोमशेट्टीवार भाजप, राजू नागोराव रिंगोले शिवसेना, हुसैन आसिम हुसैन मंजुर एमआयएम, शेख अब्दुल रज्जाक अपक्ष
प्रभाग 9 अ – किरण शंकर देरकर शिवसेना (उबाठा), इंदिरा सुधाकर पारखी शिवसेना, भारती श्रीकृष्ण बदखल भाजप,
प्रभाग 9 ब – अ. अफिज सत्तार अपक्ष, समिश नामदेव इचवे आप, भारत शंकर कुमरे अपक्ष, राजेश मारोती खाडे शिवसेना, साकीब अहेमद खान एमआयएम, गोविंदा सुरेश दुर्गे वंचित बहुजन आघाडी, प्रवीण प्रभाकर बलकी भाजप, शत्रुघ्न मारोती मालेकर शिवसेना (उबाठा), अतिक इनामुर्महिम सैयद अपक्ष
प्रभाग 10 अ – खान सुरैय्या बानो युसुफ खान एमआयएम, हर्षाली कैलास पचारे शिवसेना (उबाठा), आरती गिरीष वांढरे भाजप, संगिता रामेश्वर मांढरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, स खैरनबी कादर प्रहार जनशक्ती पक्ष, मिनाक्षी राजू साठे शिवसेना,
प्रभाग 10 ब – खान रेहान युसुफ, अनिल लाभचंद चिंडालिया भाजप, निखिल अनिल वैरागडे अपक्ष, अक्षय राजेंद्रकुमार बोथरा शिवसेना, संजय रतनप्रकाश पुरावार शिवसेना (उबाठा)
प्रभाग 11 अ – सोनाली नितीन आत्राम, अंकिता ज्ञानेश्वर कुळसंगे काँग्रेस, पुष्पा कवडू कुळसंगे आप, ज्योती मधूकर मेश्राम राष्ट्रवादी शरद पवार, रेखा विलास कोवे
प्रभाग 11 ब – अजय विठ्ठलराव चन्ने अपक्ष, गणेश रघुनाथ चुरे अपक्ष, राजेश वामनराव डफ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, प्रशांत शामराव नक्षीणे अपक्ष, मिलिंद राजू बावणे अपक्ष, अशोल गणपत बिलोरिया काँग्रेस, लवलेश किशनलाल लाल भाजप, शेख मोहम्मद अल्ताफ रहिम शिवसेना
प्रभाग 12 अ – अक्षता कोकाजी चव्हाण, पूजा रविंद्र रामगिरवार भाजप, सोनाली अमृत पुरी, शीला रविद्र मेश्राम काँग्रेस, अफसाना काजी मुस्तकोद्दीन अपक्ष
प्रभाग 12 ब – अविनाश सुनील उईके वंचित बहुजन आघाडी, आकाश सुधाकर उईके काँग्रेस, बबन रामचंद्र केळकर अपक्ष, नरेंद्र गणपत गेडाम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, हरिदास धोंडुजी गेडाम अपक्ष, हरिओम प्रकाश गेडाम शिवसेना, अमोल विजय चांदेकर अपक्ष, मनोज कवडू सिडाम भाजप, विजय रमेश मेश्राम अपक्ष
प्रभाग 13 अ – अलका मारोती मोवाडे काँग्रेस, ललिता मारोती भेदोडकर भाजप, किरण मुरलीधर कुत्तरमारे शिवसेना
प्रभाग 13 ब – धर्मेंद्र नामदेव काकडे शिवसेना, राजेश्वर सुरेश चापडे भाजप, प्रवीण अशोक डाहुले अपक्ष, निखिल धर्मा ढुरके अपक्ष, दादाजी लटारी पोटे आप, रहेमान सैफूर मोबिन काँग्रेस, पुरण कुंदणगीर पवार प्रहार जनशक्ती पार्टी
प्रभाग 14 अ – मनिषा राजू गव्हाणे भाजप, , निलीमा सचिन गेडाम अपक्ष, ज्योत्स्ना अरविंद पुसनाके अपक्ष, आशाताई पांडुरंग टोंगे काँग्रेस, तुळसा प्रवीण पेंदोर शिवसेना, माधुरी महेश साळुंके शिवसेना (उबाठा), वंदना महेश पारखी अपक्ष
प्रभाग 14 ब – संतोष पुंडलिक पारखी, शिवसेना, दिपक मारोती मोरे भाजप, रंगरेज गुलाम रसूल वली शिवसेना (उबाठा), सुभाष बाबुलाल वाघडकर भाजप
प्रभाग 14 क – हिना अहेमद शकील शिवसेना, माया मारोती ढुरके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, अर्चना शंकरराव झिलपे भाजप
(विशेष टीप – उमेदवारांचा पक्ष कळला नसल्याने काही उमेदवारांचा पक्ष बातमीत टाकण्यात आला नाही. तसेच काही उमेदवारांनी पक्ष व अपक्ष असे दोन्ही फॉर्म भरल्याने काही उमेदवारांच्या पक्षात चुकी होऊ शकते.)



Comments are closed.