प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपची जंगी रॅली – घरोघरी प्रचार
सौ. रीता महेश पहापळे, आशिष ज्ञानेश्वर डंबारे आणि विद्या खेमराज आत्राम यांच्या प्रचारार्थ रॅली
बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. रविवारी प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पक्षाने आज ताकद दाखविणारी भव्य रॅली काढली. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या निनादात निघालेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. रीता महेश पहापळे आणि आशिष ज्ञानेश्वर डंबारे यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला.
या प्रचारयात्रेत भाजप कार्यकर्त्यांनी गल्लीबोळ पिंजून काढत मतदारांशी संवाद साधला. “विकासासाठी भाजपा” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्त्यांवर उभे राहून नागरिकांनी हात हलवून प्रतिसाद दिला, जणू प्रचारयात्रा लोकांच्या मनात थेट पोहोचत होती.
माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या कार्यकाळात झालेल्या रस्ते, नाल्या, पथदिवे यांसारख्या मूलभूत कामांची आठवण करून देत भाजपने प्रचारात ‘विकास कार्ड’ मतदारांसमोर मांडले. तसेच मतदारांना विकासाची जाण करून देण्यावर भर दिला. भाजपने आखलेल्या रणनीतीनुसार संपूर्ण टीम मैदानात उतरली होती.

प्रचारयात्रेचे नेतृत्व माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार आणि शहराध्यक्ष अॅड. निलेश चौधरी यांनी केले. यावेळी जेष्ठ नेते महादेव खाडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, जिल्हा सचिव संतोष डंबारे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रेयस हरणे, तालुकाध्यक्ष (पूर्व) प्रदीप जेऊरकर आणि तालुकाध्यक्ष (पश्चिम) मीराताई पोतराजे, नितीन वासेकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ही रॅली केवळ ताकद दाखविणारी नव्हती, तर विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना पटविण्याचा प्रयत्न होता. ढोल-ताशांच्या गजरात झालेली ही प्रचारयात्रा निवडणुकीच्या वातावरणात नवा रंग भरून गेली.



Comments are closed.