भाजपचा शिस्तबद्ध व नियोजनबद्ध डबल शिफ्टमध्ये प्रचार

ज्येष्ठांचे मार्गदर्शन व शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांचे बिनतोड व्यवस्थापन

बहुगुणी डेस्क, वणी: भाजप हा पक्ष उत्तम नियोजन व शिस्तप्रिय पक्ष ओळखला जातो. शिस्त आणि नियोजन हेच भाजपचे बळ आहे आणि वणीतील प्रचारात त्याची झलक स्पष्ट दिसत आहे. मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात सध्या दोन शिफ्टमध्ये प्रचार सुरु आहे. या संपूर्ण प्रचाराच्या रणधुमाळीत एक नाव आवर्जून घेतले जात आहे ते नाव म्हणजे भाजपचे शहर अध्यक्ष ऍड निलेश चौधरी यांचे !

ऍड निलेश चौधरी यांची शहरातील सुप्रसिद्ध विधिज्ज्ञ म्हणून ओळख आहे. गेल्या काही काळापासून त्यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. त्यांच्या राजकारणाचा पाया हा सामाजिक क्षेत्रातला आहे. अलीकडेच त्यांच्याकडे ऍड निलेश चौधरी यांच्या कडे भाजपचे शहराध्यक्ष पद आले आहे. प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्याकडे यंदाच्या निवडणुकीच्या प्रचार व्यवस्थापनाची धुरा आली आहे. विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व आ. संजीवरेड्डी बोदकुरवार व स्थानिक ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनात त्यांनी प्रचार व प्रसाराच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे खांद्यावर उचलली आहे.

सकाळपासून रात्री पर्यंत प्रचार व जनसंपर्क
भाजपतर्फे वणी नगरपालिका निवडणुकीची रणनिती आधीच तयार करण्यात आली आहे. मतदारांचे विश्लेषण, टीम गठन, सोशल मीडिया अभियान याची संपूर्ण स्ट्रॅटेजी आखली गेली आहे. तर रोज केल्या जाणा-या प्रचाराचे संपूर्ण नियोजन एक दिवस आधीच तयार केले जाते. रॅली, कॉर्नर बैठक, गृहबैठक हे प्रचाराचे सर्वोत्तम साधन मानले जाते. मात्र केवळ या थेट बाबीच म्हणजे प्रचार नव्हे ही बाब भाजपला चांगलीच माहिती आहे. रोज सकाळी विविध प्रभागातील बुथ प्रमुखांची बैठक तर प्रचार संपल्यानंतर निवडणुकीत प्रभाव टाकू शकणा-या व्यक्तीसोबत बैठक आयोजित केली जाते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विविध पॉकेट्स टारगेट
विशिष्ट मतदार गटाला ‘पॉकेट्स’ हा शब्द राजकारणात वापरला जातो. वय, जात, धर्म, लिंग, व्यवसाय तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार मतदारांचे काही पॉकेट्स असतात. प्रचाराची रणनीती ठरवताना पॉकेट्सवर विशेष लक्ष दिले जाते. कारण यामुळे कमी वेळेत जास्त परिणाम साधता येतो. याला अनुसरून विविध पॉकेट्स भाजपतर्फे टारगेट केले गेले आहे. रोज सकाळी व रात्री यासाठी बैठक लावली जाते. पक्षातील ज्येष्ठ नेते तसेच विविध सेलचे पदाधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत. यासह भाजपने प्रत्येक प्रभागात प्रचार प्रभारींची टीम उभी केली आहे. त्यांच्या कडून शहर अध्यक्षांकडून रोजचा पाठपुरावा घेतला जातो. तसेच त्यांना येणारी अडचण याबाबत चर्चा करून ती समस्या सोडवण्यावर भर दिला जातो.

सर्वांची बांधली मोट – पक्ष एकसंघ
निवडणुकीच्या काळात गटबाजी व नाराजी ही मतांवर परिणाम करणारी मोठी अडचण ठरते. मात्र भाजपने यावेळी या सर्व मतभेदांना मागे टाकत एकसंघतेची मोट बांधली आहे. छोट्या कार्यकर्त्यापासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वजण प्रचारात एकसंघ दिसून येत आहे. सर्वांची ‘इमाने-इतबारे’ काम करण्याची भावना मतदारांवर सकारात्मक छाप पाडत आहे. परिणामी पक्षाच्या शिस्तबद्ध प्रचाराला अधिक बळकटी मिळत आहे.

वणीतील भाजपचा प्रचार हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून, तो संघटनशक्ती, शिस्त आणि नियोजनाचा जिवंत नमुना ठरत आहे. मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाने, ऍड. निलेश चौधरी यांच्या व्यवस्थापनामुळे व पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सहकार्य व मार्गदर्शनामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता आत्मविश्वासाने काम करताना दिसत आहे. नॉन-पॉलिटिकल व्यक्तीं देखील पक्षाशी जुळल्याने प्रचाराला नवी ऊर्जा दिली आहे. एकसंघ बांधलेली मोट, टार्गेट केलेले पॉकेट्स आणि सकाळपासून रात्रीपर्यंत ‘डबल’ शिफ्टमध्ये चालणारा प्रचार यामुळे भाजपचा मतदारांवर ठसा उमटत आहे. या शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध मोहिमेचा परिणाम निवडणुकीच्या निकालात नक्कीच उमटणार, अशी सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.

इंस्टाग्राम साठी येथे क्लिक करा…

Comments are closed.