श्रीमती कमळ नीलकंठराव पिंपळे यांचे अल्पशा आजाराने निधन

वणीतील जेष्ठ समाजसेवक सतीश पिंपळे यांना मातृशोक

बहुगुणी डेस्क, वणी: जेष्ठ समाजसेवक श्री. सतीश पिंपळे यांच्या मातोश्री श्रीमती कमळ नीलकंठराव पिंपळे (वय 75) यांचे अल्पशा आजाराने दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9.45 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व नातेवाईक असा मोठा परिवार आहे. समाजकार्यात सक्रिय भूमिका निभावणाऱ्या पिंपळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, विविध सामाजिक मान्यवरांनी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. अंत्ययात्रा दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता पिंपळे कुटुंबीयांच्या राहत्या घरातून माऊली निवास, नांदेपेरा रोड  येथून निघणार आहे. वणीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

Comments are closed.