आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वणीत, शासकीय मैदानावर जाहीर सभा
दु. 12 वाजता भव्य शक्ती प्रदर्शन रॅली तर 2 वा. जाहीर सभा
बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. भाजपच्या उमेदवारांसाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज वणीत प्रचारसभा घेणार आहे. शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ दु. 2 वाजता ही सभा होणार आहे. तत्पुर्वी दुपारी 12 वाजता भाजपच्या वतीने शहरात भव्य शक्तीप्रदर्शन रॅली काढण्यात येणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात भाजपने आघाडी घेतली असून भाजपच्या प्रचाराला व्यापक पाठिंबा मिळत असताना दिसत आहे. आज चंद्रशेखर बावनकुळे हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा व त्याआधी होणा-या शक्ती प्रदर्शन रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे.
शनिवारी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता भाजपतर्फे शहरात भव्य शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात येणार आहे. यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम व 29 नगरसेवकांचा मुख्य समावेश राहणार आहे. छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात होणार आहे. ही रॅली वणीतील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे. रॅलीची सांगता शासकीय मैदानावर होणार आहे. त्यानंतर तिथे लगेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रचार सभा होणार आहे.
भाजपचा जोमदार प्रचार
वणी नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात भाजपने प्रचाराची धुरा भक्कमपणे खांद्यावर घेतली असून, मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात पक्षाने शिस्तबद्ध रणनीती अवलंबली आहे. गृहभेटी, कॉर्नर सभा आणि डोअर टू डोअर जनसंपर्काच्या माध्यमातून भाजपने प्रभागनिहाय मतदारांशी थेट संवाद साधला आहे. त्यामुळे हा प्रचार अधिक प्रभावी झाला आहे.
विकासाच्या मुद्यावरच प्रचार
भाजपचा गेल्या दहा वर्षांच्या विकासकामांचा व नगरपालिकेच्या काळातील झालेल्या कार्याचा ठोस दाखला देत प्रचार सुरु आहे. रस्ते बांधणी, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता, बागिचे, स्ट्रीट लाईट्स इत्यादी विकासकामांची तसेच मतदारसंघात खेचून आणलेला विकासकामांच्या निधीची आठवण मतदारांना आकर्षीत करीत आहे. प्रभाग 1 ते 14 पर्यंतच्या रॅली आणि कॉर्नर सभांमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, पक्षाला विजयाची खात्री वाटत आहे.
प्रचार अंतिम टप्प्यात असताना आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आज सभा आहे. या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेला वणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार व शहराध्यक्ष ऍड निलेश चौधरी यांनी केले आहे.



Comments are closed.