या हायव्होल्टेज प्रभागातील अपक्ष उमेदवार ‘पॅक’ झाल्याचा प्रचार
नेत्यासोबत फोटो होतोय व्हायरल... पॅक झाल्याच्या चर्चेत किती तथ्य ?
बहुगुणी डेस्क, वणी: नगरपालिका इलेक्शन आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. जस जसी मतदानाची तारीख जवळ येत आहे. तस तसा अफवांच्या बाजाराला ऊत यायला सुरुवात झाली आहे. कुणी तरी सेटर अमुक एरीया ‘पॅक’ केला, तमुक वस्ती ‘पॅक’ केली असे बतावणी करत फिरतो. तर विरोधकांचे हा उमेदवार ‘पॅक’ झाला तो उमेदवार ‘पॅक’ असे शब्द आता कानावर येऊ लागले. असाच एक ‘पॅक’ झाल्याचा प्रकार वणीतील एका बहुचर्चित प्रभागातून समोर येत आहे. या प्रभागातील एक अपक्ष उमेदवार याला मतदारांचे त्याला चांगलेच समर्थन मिळत आहे. परिणामी अपक्ष असूनही सदर उमेदवार रेसमध्ये पुढे धावत आहे. दरम्यान त्यांचा एक फोटो विरोधकांकडून चांगलाच व्हायरल केला जात आहे. निवडणुकीत ऍक्टिव्ह असलेल्या या नेत्या सोबत असलेला एक फोटो व्हायरल करून उमेदवार ‘पॅक’ झाल्याची अफवा वेगाने पसरवली जात आहे. ही सर्व घडामोड आहे वणीतील सर्वात हायव्होल्टेज प्रभागापैकी एक प्रभाग असलेल्या 11 या प्रभागातील. तसेच हा उमेदवार आहे गणेश चुरे !
गणेश रघुनाथ चुरे हा होतकरू तरुण प्रभाग 11 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. एक होतकरू व अडल्या नडल्यांच्या कायम मदतीला धावून जाणारा तरुण म्हणून त्यांची प्रभागात ओळख आहे. बॅट हे चुरे यांचे बोधचिन्ह असून सध्या त्यांची प्रचाराची ‘बॅट’ प्रभागात चांगलीच तळपत आहे. त्यामुळे विरोधकांचे ‘चेंडू’ डोक्यात गेले आहेत. त्यांचे मुख्य विरोधक असलेल्या एका उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून गेल्या 24 तासांपासून प्रभागात एक फोटो व्हायरल केला जात आहे. या फोटोत गणेश चुरे व वार्डातील तरुण वणीतील एका नेत्यासोबत आहेत. विरोधकांनी हा फोटो हेरून सध्या गणेश चुरे ‘पॅक’ झाला असा अपप्रचार सुरु केला आहे.
फोटो मागची पार्श्वभूमी काय आहे?
गणेश चुरे यांना प्रभागातील नागरिकांनी परिसराचा एकमुखी आवाज म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. पक्षाचे तिकीट मिळावे म्हणून त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी शहरातील प्रमुख पक्षातील बड्या नेत्यांचे उंबरठे झिजवले. काही पक्षांनी उमेदवार आधीच ठरला असे सांगून त्यांना नम्रता पूर्वक नकार दिला. मात्र एका पक्षाकडून त्यांचे नाव चर्चेत होते. तिकीटाच्या रस्सीखेचमध्ये त्यांनी या बड्या नेत्याची ‘विजया’च्या आशेने दोन-तीनदा भेट घेतली. मात्र फॉर्म भरण्याच्या एक दिवस आधी वणीतील एका ‘बड्या’ नेत्याचा सहकारी त्यांच्या पक्षात आला. गणेश चुरे यांची तिकीट कापली गेली.
सदर व्हायरल फोटो हा त्याचा काळातील आहे. तिकीटाच्या आशेने फॉर्म भरण्याच्या आधी गणेश चुरे व त्यांच्या सहका-यांनी तिकीट वाटणा-या या बड्या नेत्याची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी या बड्या नेत्याला बुके दिले होते. हाच फोटो सध्या या नेत्याचा ‘उमेदवार’ व त्याचे सहकारी व्हायरल करीत आहे. विरोधकांनी सुरु केलेला हा प्रकार खोडसाळ असून कोणत्याही अफवांना बळी पडू नका. तसेच या निवडणुकीत बहुमताने निवडून येईल असा दावा गणेश चुरे यांनी केला आहे.
मी जनतेचा उमेदवार !
मी जनतेने उभा केलेला उमेदवार आहे, बाजारात विकलं जाणारं ‘पॅकेज’ नाही. माझं बोधचिन्ह बॅट आहे — आणि ही बॅट सत्य, संघर्ष आणि परिवर्तनासाठीच उगारली गेली आहे. अफवा पसरवणाऱ्यांनी लक्षात घ्यावं, आजही मी प्रभागात डटून उभा आहे आणि उद्याही विजय हा जनतेचाच असेल. विरोधकांनी कितीही चेंडू फेकले तरी त्याचे चेंडू सिमापार कसे टोलवावे हे मला चांगले कळते. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, जे विरोधक अफवा पसरवत आहेत ते निकालानंतर घरी बसणार आहेत. – गणेश चुरे, उमेदवार प्रभाग 11

गणेश चुरे वणी बहुगुणी बोलताना म्हणाले की फॉर्म भरण्याच्या आधी व फॉर्म भरल्यानंतर विथड्रॉसाठी प्रचंड दबाव आणला गेला. मात्र मी कोणत्याही दबावाला बळी पडलो नाही. ना पुढे पडणार. जे फोटो आज व्हायरल केले जात आहेत, ते माझ्या संघर्षाच्या काळातील आहेत — जेव्हा पक्षाच्या तिकीटासाठी संघर्ष करीत नेत्यांचे दरवाजे ठोठावत होतो. पण काही लोकांनी त्यालाच वेगळा रंग देत ‘मी पॅक झालो’ असा अपप्रचार सुरू केला. प्रभाग 11 च्या प्रभागातील मतदारांशी माझी बांधीलकी आहे. ही बांधीलकी शेवटपर्यंत कायम राहील. उलट विरोधकांच्या अशा खोडसाळ प्रकारामुळे मतदारांची सहानुभूती वाढली आहे. असे देखील चुरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान गणेश चुरे यांनी प्रभागात भव्य रॅली काढून विरोधकांचे तोंड बंद केले आहे.



Comments are closed.