भीषण अपघात: बसमध्ये घुसला हायस्पीड ट्रक…. भयंकर किंचाळ्या !

जळका फाट्याजवळ लालपरीला ट्रकची धडक, आमदार पोहोचले बचावकार्यासाठी.....

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यात जळका फाट्याजवळ आज रात्री 8 वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला. चंद्रपूरहून अकोल्याला जाणा-या एसटी महामंडळाच्या बसला एका ट्रकने जबर धडक दिली. यात अनेक लोक जखमी झालेत. अद्याप मृतांचा व जखमींचा अधिकृत आकडा आला नसला तरी ऑन स्पॉट दोघांचा मृत्यू झाला व सुमारे 15 ते 20 लोक जखमी आहेत अशी प्रथमिक माहिती आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळावर लोक मदतीसाठी गोळा झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी पांढरकवडा व यवतमाळ येथे दाखल केले. अपघात झाला त्यावेळी आमदार संजय देरकर हे जळका येथे एका कार्यक्रमात होते. त्यांनी तात्काळ कार्यक्रम थांबवत घटनास्थळ गाठत बचावकार्यात सहभाग घेतला. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या एका साईडचा भाग व ट्रकने धडक दिलेला भाग संपूर्ण चेंदामेंदा झाला. 

प्राप्त माहितीनुसार, अकोला-चंद्रपूर ही एसटी महामंडळाची बस (MH 40Y 57820) दुपारी अकोल्याकडून चंद्रपूरसाठी निघाली. बस करंजी क्रॉस करून मारेगाव कडे येत होती. दरम्यान जळक्याजवळ (कोठेड़ा) फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायस्पीड ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या भीषण सुमारे 15  प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले. तसेच दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच दोन ते तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. 

ही धडक इतकी भीषण होती की हायस्पीड येणा-या ट्रकने बसची एक बाजू पूर्णपणे चिरडत पुढे दूरवर नेली. सद्या दोन मृतांची माहिती समोर येत असून यातील एक जण मारेगाव तालुक्यातील असल्याची माहिती पुढे येत आहे. अपघात झाल्याचे कळताच स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांनी व मदतकार्याला धाव घेतली. जखमींना तात्काळ पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात व गंभीर रुग्णांना यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आमदार संजय देरकर पोहोचले घटनास्थळी
आज संध्याकाळी जळका येथे आमदार संजय देरकर यांचा एका कार्यक्रमासाठी दौरा होता. ते या कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र कार्यक्रमादरम्यान त्यांना अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ कार्यक्रम थांबवण्याची विनंती केली व ते त्यांच्या टीमसह व ग्रामस्थांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांचे सहकारी, सुरक्षा रक्षक व आमदार स्वत: बचाव कार्यात सहभागी झाले. तसेच जळका येथील ग्रामस्थ बचावकार्यात सामील झाले. त्यांनी जखमींना बाहेर काढले. आमदार स्वत: एका ऍम्ब्युलन्स मध्ये बसून त्यांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले.

मृतामध्ये एक लातूर येथील प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती असून दुसरा मृत हा मारेगाव तालुक्यातील असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याचा अधिकृत खुलासा झालेला नाही. तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. तसेच सुमारे 15 प्रवाशी जखमी आहेत. अशी माहिती आहे. 

Comments are closed.