गुरुवारी वणीत सुप्रसिद्ध विदर्भ आयडॉल स्पर्धेचे ऑडिशन (पहिला राऊंड)

रविवारी रंगणार मुख्य स्पर्धा, इंडियन आयडॉल फेम उत्कर्ष वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थिती

बहुगुणी डेस्क, वणी: गुरुवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी स्वरधारा विदर्भ आयडॉलचा ऑडिशन राऊंड (पहिला राऊंड) होणार आहे. सकाळी 9 वाजेपासून छत्रपति शिवाजी महाराज उद्यान येथे या स्पर्धेच्या निवड चाचणीला सुरुवात होणार आहे. यात वणी, मारेगाव, झरी तसेच वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा, कोरपना व घुग्गुस या तालुक्यातील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. तर विदर्भातील इतर तालुक्यातील राउंडची ऑडिशन ही रविवारी स. 9 ते 4 या वेळेत होणार आहे. ऑडिशन ही सशुल्क असून पहिल्या राउंडसाठी 200 रुपये व दुस-या राउंडसाठी 200 रुपये फिस ठेवण्यात आली आहे. तर रविवारी होणा-या ऑडिशनची फिस ही 400 रुपये राहणार आहे.

 श्री साई म्युझिकल गृप, श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र, मैत्रेय फाउंडेशनतर्फे व स्व. पंडीत रामगोपालजी जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ या विदर्भ आयडॉल या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संतोष जोशी 9370673050, अजित खंदारे 9130175687 व दिगांबर ठाकरे 8805925758 यांना संपर्क साधता येणार आहे.

 

प्रमुख आकर्षण उत्कर्ष वानखेडे
रविवारी दिनांक 28 रोजी वरोरा रोडवरील बाजोरिया लॉन येथे सकाळी 9 वाजेपासून विदर्भातील इतर तालुक्यातील पहिल्या राउंडला सुरुवात होणार आहे. तर दुपारी 5 वाजता मुख्य स्पर्धा होणार आहे. स्पर्धेला मुंबई येथील इंडियन आयडॉल (2024) फेम उत्कर्ष वानखेडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. संध्याकाळी 7 वाजता उत्कर्ष वानखेडे यांचा गीत गायनाच्या कार्यक्रमाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्पर्धेचे स्वरुप कसे राहणार?
सदर स्पर्धा ही खुली असून यात विदर्भातील कोणत्याही स्पर्धकांना भाग घेता येणार आहे. पहिल्या राउंडमधल्या टॉप 20 स्पर्धकांना दुस-या राउंडमध्ये प्रवेश मिळणार आहे. गुरुवारी वणी, मारेगाव, झरी तसेच वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा, कोरपना व घुग्गुस या तालुक्यातील स्पर्धकांची ऑडिशन होणार आहे. तर रविवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत विदर्भातील उर्वरीत तालुक्यातील स्पर्धकांची ऑडिशन वरोरा रोडवरील बाजोरिया लॉन येथे होणार आहे. दु. 5 वाजता बाजोरिया लॉन येथे दुसरी म्हणजे मुख्य फेरी होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. नामवंत कलावंत या स्पर्धेत परीक्षक म्हणून काम पाहणार आहे.

स्पर्धा तसेच उत्कर्ष वानखेडे यांच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. आयोजक संतोष जोशी, दिगांबर ठाकरे, जयप्रकाश सूर्यवंशी यांच्या आयोजनात, अजित खंदारे, अरुण डवरे यांच्या संयोजनात व सविता डोर्लीकर, विणा मोहितकर, सुचिता गहुकर यांच्या सहआयोजनात ही स्पर्धा होत आहे.

Comments are closed.