वणी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण पूर्ण; गुन्ह्यातील मुद्देमाल परत

पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत गुन्हे आढावा बैठक पार

बहुगुणी डेस्क, वणी : यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी दिनांक 08 जानेवारी 2026 रोजी वणी पोलीस स्टेशनचे 2025-26 या वर्षाचे वार्षिक निरीक्षण पूर्ण केले. या भेटीदरम्यान पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच सामाजिक उपक्रम आणि गुन्ह्यातील मुद्देमाल परत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पडले.

वार्षिक निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर वणी पोलीस स्टेशन परिसर स्वच्छ करून रंगरंगोटी करण्यात आली होती. सर्व प्रशासकीय रेकॉर्ड अद्यावत करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या आगमनावेळी शिस्तबद्ध Guard of Honor देण्यात आला.

शहरातील व्यापारी संघटनेने पोलीस अधीक्षकांचे स्वागत करून कायदा-सुव्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील पोलीस पाटील यांची विशेष बैठक घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या अपराध क्रमांक 735/2025 (दरोड्याचा गुन्हा) मधील जप्त केलेला ₹12,52,835 किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादी संजय निळकंठराव कोंडावार (रा. वणी) यांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते परत करण्यात आला. मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादीने पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

पोलीस वर्धापन दिन सप्ताहाचे औचित्य साधून रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी नागरिकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. दुचाकी चालवताना सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

डवगुन्हे आढावा आणि वृंद परिषद

पोलीस अधीक्षकांनी प्रलंबित गुन्हे, दोषारोप पत्रांची स्थिती आणि गुन्हेगारी नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी वृंद परिषद घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व सोण्याचे आश्वासन दिले.

 

या वार्षिक निरीक्षणामुळे वणी पोलीस दलात उत्साहाचे वातावरण असून, पोलीस अधीक्षकांनी ठाण्याच्या अद्यावत कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून अधिक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

Comments are closed.