शासकीय योजनांचा लाभ आता वणीमध्येच; लोढा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार

गोरगरीब रुग्णांसाठी वरदान ठरले लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुप्रसिद्ध लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आता वणी उपविभागासाठी नवा आशेचा किरण ठरत आहे. शासकिय योजनांचा लाभ देणारे हे वणी उपविभागातील पहिले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठरले आहे. केंद्र सरकारची आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या माध्यमातून येथे गोरगरीब रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत मिळणार आहे.

आधी योजनेचा लाभ घेण्यासाठी वणी व परिसरातील ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना मोठ्या शहरांत जाण्याची गरज पडत होती. मात्र आता नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा वणीमध्येच उपलब्ध होणार आहे. या योजनेचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लोढा हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

उपलब्ध आरोग्य सेवा
लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वणी येथे रुग्णांसाठी विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. जनरल मेडिसिन (हृदयविकार, विषबाधा, सर्पदंश इ.) हृदयरोग, फुफ्फुस विकार, मेंदू विकार, डायलिसिस, संसर्गजन्य रोग, संधिवात, अतिदक्षता (ICU), नवजात शिशु व बालरोग, मुतखडा व मूत्ररोग शस्त्रक्रिया, बालरोग शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूती शस्त्रक्रिया, हाडांची शस्त्रक्रिया (फ्रॅक्चर व अपघातजन्य), सामान्य शस्त्रक्रिया असे विविध उपचार उपलब्ध आहेत.

नागपूर व चंद्रपूर येथील तज्ज्ञांची ओपीडी
हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप वरघणे हे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत रुग्णांची तपासणी करतील. कॅन्सर (कर्करोग) विशेषज्ञ डॉ. अभिनव पूप्पलवार हे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत सेवा देतील. मुतखडा व मूत्ररोग सर्जन डॉ. अनिकेत देशमुख हे महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या रविवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत उपलब्ध राहतील. तर वंधत्व व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शरद इंगळे हे महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत रुग्ण सेवा देतील.

लवकरच ग्रामीण भागात कॅम्प
“लवकरच वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील ग्रामीण भागात मोफत आरोग्य कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. या कॅम्पमध्ये रुग्णांची तपासणी, आयुष्मान कार्ड वितरण आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल. लोढा हॉस्पिटल हे शासकीय योजनेअंतर्गत सेवा देणारे वणीतील पहिले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठरले असून गोरगरीब रुग्णांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.”
– डॉ. महेंद्र लोढा, संचालक लोढा हॉस्पिटल

रुग्णांनी आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच कार्ड तयार करण्यासाठी हॉस्पिटलशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 7743916588 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. किंवा शेतकरी मंदिर रोड, बस स्टँड समोर, वणी येथील हॉस्पिटलला देखील भेट देता येणार आहे.

वणी उपविभागातील रुग्णांसाठी लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे एक वरदान ठरत आहे. शासकीय आरोग्य योजनांचा लाभ थेट स्थानिक पातळीवर मिळाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना आता दूरवर जाण्याची गरज राहिलेली नाही. नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेसह आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने येथील आरोग्यसेवेची पातळी उंचावली आहे. गोरगरीब रुग्णांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेणे शक्य झाले आहे. यामुळे वणी परिसरातील आरोग्य क्षेत्रात निश्चितच सकारात्मक बदल घडेल.

Comments are closed.