आदर्शमध्ये क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्या आत्राम यांचा सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आदर्श हायस्कूल येथे बुधवारी दिनांक 21 जानेवारी रोजी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन व सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी शि. प्र. समितीचे सहसचिव महादेवराव वल्लपकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा यांसारखे गुण विकसित होतो. सांघिक नृत्य व खेळांमुळे सहकार्य, संघभावना वाढीस लागते आणि नेतृत्वगुणांचा विकास होतो.

कार्यक्रमात आदर्श हायस्कूल वणी येथील सहाय्यक शिक्षिका व नगराध्यक्ष विद्या आत्राम यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी त्या म्हणाल्या की हा सन्मान माझ्या कुटुंबाचा, विद्यार्थ्यांचा, सहकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा आणि माझ्या कार्यक्षेत्राचा आहे. शिक्षण, आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून वणी शहरात व्यापक व सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी मी पुढेही योगदान देत राहीन.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सोहळ्याला अध्यक्षस्थानी शि. प्र. समितीचे सचिव तथा कार्यकारी अध्यक्ष जयसिंगराव गोहोकार उपस्थित होते. विशेष मार्गदर्शक म्हणून सहसचिव महादेवराव वल्लपकर, उद्घाटक म्हणून नगराध्यक्षा विद्या आत्राम, तर अतिथी म्हणून नगरसेविका आरती वांढरे, अर्चना झिलपे, मनिषा गव्हाणे, प्राचार्य आर. एल. मोहिते, पर्यवेक्षक एस. आर. पिदुरकर उपस्थित होते.

प्रास्ताविक पर्यवेक्षक एस. आर. पिदुरकर यांनी केले. संचालन विकास बलकी यांनी केले तर आभार प्रदर्शन वैजनाथ खडसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Comments are closed.