विठ्ठलवाडी येथील प्रवीण दिगांबर शिरनाथ यांचे निधन
आज दुपारी 12 वा. राहत्या घरून अंत्ययात्रा
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील विठ्ठलवाडी येथील प्रवीण दिगांबर शिरनाथ यांचे अल्पशा आजाराने शनिवारी संध्याकाळी निधन झाले. ते 43 वर्षांचे होते. नुकतीच त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना चंद्रपूर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रवीण यांच्या पार्थिवावर आज रविवारी दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्ययात्रा राहते घर विठ्ठलवाडी येथून निघणार आहे. प्रवीण हे एक खेळाडू होते. काही काळ त्यांनी क्रीडा शिक्षक म्हणून वणीतील शाळेत काम देखील केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ, बहिणी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रवीण यांना ‘वणी बहुगुणी’कडून भावपूर्ण श्रद्धांजली.


Comments are closed.