बहुगुणी डेस्क, वणी: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोमवार, दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता वणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध उपक्रमांद्वारे अभिवादन करण्यात येणार आहे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व राष्ट्राच्या लोकशाही मूल्यांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक उपस्थित राहणार आहेत. या अभिवादन सोहळ्यास शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.



Comments are closed.