राजू उंबरकरांच्या उपस्थितीत बोटोणीतील मोठा पक्षप्रवेश
शिवमुद्रा कार्यालयात पार पडला पक्षप्रवेश सोहळा
बहुगुणी डेस्क, वणी: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मारेगाव तालुक्यातील बोटोणी व बोटोणी पोळ येथील शेकडो युवक व ज्येष्ठ नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून तालुक्यात मनसेची ताकद वाढवली आहे. वणी येथील ‘शिवमुद्रा’ जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे व रवी आगासकांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
निवडणुकीच्या तोंडावर मनसेमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. बोटोणीतील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे ग्रामीण भागात मनसेचे पारडे जड होताना दिसत आहे. “राज्यातील राजकारण आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी मनसे हाच एकमेव पर्याय आहे,” अशा भावना पक्षप्रवेश करणाऱ्या तरुणांनी व ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या.
या पक्षप्रवेशात बोटोणीतील हर्ष मनोर घुमे, अनिकेत रुपेश आगासकांडे, अंकित सुभाष पायलवार, रोहित सुरेश शेंद्रे, विजय हुसेन कोहळे, मनीष रवींद्र आगासकांडे, पंकज चंद्रभान शेंद्रे, जय देवीदास जतकर, मंगेश नामदेव वाघाडे, रितेश शंकर राऊत, वैभव छत्रपती वाघाडे, संकेत रुपेश आगासकर, क्रिष्णा सतीश मते, साजन मेश्राम यांचा समावेश होता. तर बोटोणी पोळ येथील भीमा मोरे, नामदेव आत्राम, गोविंद टेकाम, वसंता टेकाम, अजाब आत्राम, अविनाश जुनगरी, रमेश आत्राम, निकेश आत्राम, अजाब रामकुरे, सचिन आत्राम यांनीही मनसेचा झेंडा स्वीकारला.

या सोहळ्याला मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, तालुका सचिव विनोद कुचणकार यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीत मारेगाव तालुक्यातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





Comments are closed.