‘निधी आपल्या निकट’ उपक्रमास वणीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
ईपीएफओ–ईएसआयसी अधिकाऱ्यांचा रॉकवेल मध्ये थेट संवाद
बहुगुणी डेस्क, वणी: कामगार मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “निधी आपल्या निकट – विस्तार व बळकटीकरण” या महत्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन रॉकवेल मिनरल्स भालर यांच्या सभागृहात करण्यात आले. मंगळवार, दि. 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता झालेल्या या कार्यक्रमाला कामगार, अधिकारी व पदाधिकारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास ईपीएफओ अकोला येथील इन्स्पेक्टर संतोष पॉल, ईएसआयसी नागपूरचे इन्स्पेक्टर प्रफुल बारापत्रे, ईपीएफओ कन्सल्टंट भालचंद्र चांदे, सूर्या सेमचे एच.आर. हेड हुसैन बाशा आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात भविष्य निर्वाह निधीशी संबंधित विविध अडचणी व प्रलंबित तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले. तसेच ईपीएफओ व ईएसआयसीच्या विविध योजना, नियम व लाभ याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास एस क्यूबचे जी.एम. मोटोरी व्यंकटेश, हार्मोनी मिनरल्सचे ए.जी.एम. श्रीकांत व ललित कचवे, डिलाईट केमिकलचे प्रभाकर बोडेकर, जयकिशन खुराणा, रॉकवेल मिनरल्सचे विखार उलहसन यांच्यासह रॉकवेल मिनरल्स, हार्मोनी मिनरल्स, सूर्या सेम, डिलाईट केमिकल आदी कंपन्यांचे अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तक्रारींचे तात्काळ निराकरण ही बाब विशेषत्वाने लक्षवेधी ठरली.





Comments are closed.