मारेगाव, वणी, झरीचा ‘चले जाव’ एल्गार मोर्चा
मारेगाव: आजच्या सत्ताधारी पक्षाने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची कोणतीच पूर्तता न केल्याने सरकारवर जनता नाखूष आहे, त्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दि. १० मार्चला विभागीय आयुक्त अमरावती कार्यालयावर चले जाव एल्गार मोर्चा धडकणार आहे. मारेगाव, वणी, झरी, पांढरकवडा या विभागातून लाखो शेतकरी, शेतमजुर, कामगार या चलेजाव एल्गार मोर्चात सामील होऊन शासनाकडे आपल्या मागण्या मांडणार आहे.
या मोर्चाचे नेतृत्व राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे, आयटक नेते कॉ. श्याम काळे, कॉ. अशोक सोनारकर, कॉ. संजय मांडवधरे, कॉ. दिलिप परचाके, कॉ. बंडु गोलर, कॉ. पुंडलिक ढुमने, कॉ. रमेश गायकवाड हे करणार आहे. या चले जाव एल्गार आंदोलनात शेतकऱ्याची कर्जमाफी, संपूर्ण कृषिपंपाचे बिल, स्वामीनाथन आयोग लागू करा, उत्पन्न खर्चावर ५०% जास्त हमीभाव द्या. या व विविध मागण्यांसाठी पाच तालुक्यातुन निघत असलेला चले जाव एल्गार मोर्चात लाखो लोक सहभागी होत आहे.
या मार्चात मारेगाव, वणी,राळेगाव,झरी,पांढरकवडा व घाटंजी तालुक्यातुन जनता सामील होत असुन मोठ्या संख्येने सामील होऊन आपल्या मागण्या पदरात पाडून घेन्यासाठी हाच मार्ग आहे, त्या करिता सामील व्हा असे आवाहन कॉ. अनिल घाटे, नमिता पाटील. वासुदेव गोहणे, श्रीकांत तांबेकर, बंडु उज्वलकर यांनी केले आहे.