गोकुळ नगर परिसरात बोअरवेलसह विकासकामांचे लोकार्पण
नवीन बोअरवेलमुळे पाणीपुरवठा सुधारण्याची अपेक्षा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील गोकुळ नगर परिसरात नगर परिषद सर्वसाधारण निधीतून पूर्ण करण्यात आलेल्या नव्या बोअरवेल खणकामासह विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगर परिषद वणीच्या अध्यक्षा विद्या खेमराज आत्राम उपस्थित होत्या. यावेळी उपाध्यक्ष तथा जलपूर्ती सभापती राकेश लक्ष्मण बुग्गेवार, भाजप वणी शहराध्यक्ष अॅड. निलेश चौधरी, आरोग्य सभापती अनिल लाभचंद चिंडालिया, नगरसेविका मनीषा राजू गव्हाणे, नगरसेविका अर्चना शंकरराव झिलपे तसेच नगरसेवक रंगरेज गुलामरसूल वली यांची प्रमुख उपस्थिती होती.
नव्याने उभारण्यात आलेल्या बोअरवेलमुळे गोकुळ नगर परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. यासोबतच परिसरातील इतर मूलभूत सुविधांनाही गती मिळणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगर परिषदेचे आभार मानले. विकासकामांमुळे परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळणार असून आगामी काळातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.



Comments are closed.