सवित्रीदेवी कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

रुग्णालय प्रशासन व औषधनिर्माण व्यवस्थापनाची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती

बहुगुणी डेस्क, वणी: सवित्रीदेवी कॉलेज ऑफ फार्मसी, वणी येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत डॉ. जुमनाके मेडिकेअर हॉस्पिटल तसेच मोरया फार्मा, वणी येथे शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना रुग्णालय व फार्मसीच्या दैनंदिन कामकाजाची प्रत्यक्ष माहिती मिळावी हा होता.

Birthday

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना रुग्णालयातील विविध विभागांचे कार्य समजावून सांगण्यात आले. जनरल वॉर्ड, स्पेशल वॉर्ड, लेबर वॉर्ड, Major O.T, Minor O.T, PICU, NICU तसेच इतर पूरक विभागांची कार्यपद्धती आणि प्रशासन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. रुग्णसेवेची साखळी, रुग्ण नोंदणी प्रक्रिया, औषध वितरण प्रणाली आणि विभागांतील समन्वय कसा साधला जातो, याची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहणी करता आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याशिवाय विद्यार्थ्यांनी फार्मसी विभागालाही भेट देऊन औषध साठवणूक, वितरण, स्टॉक व्यवस्थापन, प्रिस्क्रिप्शन तपासणी आणि फार्मासिस्टची भूमिका याविषयी सखोल ज्ञान प्राप्त केले. अशा प्रकारच्या शैक्षणिक भेटींमुळे विद्यार्थ्यांना रुग्णालय व फार्मसी व्यवस्थापनाचे आधुनिक स्वरूप समजण्यास मदत होते तसेच त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ होते.

डॉ. जुमनाके आणि त्यांच्या संपूर्ण टीमने उत्कृष्ट सहकार्य केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य लियाकत अली यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राध्यापक पल्लवी वाघमारे, अश्विनी खिरटकर, मुबिना हैदरी, अनुश्री गोहोकर आणि अवंतिका पावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

Comments are closed.