राजुर (गोटा) ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात दिरंगाई
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील राजुर (गोटा) येथे ग्रामपंचायतीवर प्रशासक न नेमल्याने विकासकामे खिळली आहे. ग्रामपंचायत मधील एकाच कुटुंबातील ४ सदस्य अपात्र झाल्याने ७ पैकी फक्त ३ सदस्य सध्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार कोण चालवणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राजुर (गोटा) गावात दोन गट असून दोन्ही गट एकमेकविरुद्ध कलगीतुरा रंगतो. या दोन्ही गटाकडून असे एकही कार्यालय सुटले नाही की जिथे यांनी तक्रार केली नसावी. यातूनच गावातील मोहन भगत यांनी ग्रामपंचायत सद्स्य बाबाराव खडसे, त्यांची पत्नी प्रेमीला खडसे मुलगा सुंदर खडसे व सून सपना खडसे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यवतमाळ व आयुक्तालय अमरावती सह नागपुर उच्च न्यायलयपर्यत ग्रामपंचायत सद्स्यत्व पद रद्द करण्याकरिता धाव घेतली. त्यात भगत यांना यश प्राप्त होऊन ८ मार्च २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांनी वरील चारही सदस्य याना शासकीय जमिनीवर अतिक्रमन करून ताबा केल्याचे सिद्ध झाल्याने अपात्र घोषित केले.
या गोष्टीला एक महीना लोटला परंतु ग्रामपंचायत वर प्रशासक बसविण्यात उशीर होत असल्याने गावकरी यांनी गटविकास अधिकारी यांना विनंती अर्ज करून प्रशासक नेमावे अशी मागणी केली. जेणे करून गावातील नागरिकांना कोणत्याही कागद पत्राची किवा विकास कामात अडचण येऊ नये. परंतु गावातील दोन्ही गटाकडून वेगवेगळे पत्र आल्याने गतविकास अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना दोन्ही गटातील तकरारीची बाजू मांडून पत्र लिहून परवानगी मागितली आहे.
नियमानुसार गटविकास अधिकारी यांना प्रशासक नेमण्याचे अधिकार असताना का नेमत नाही असाही प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. ग्रामपंचायतीची बॉडी ७ लोकांची असून त्यातही ४ सदस्य अपात्र झाले असल्याने विकास कामात अडचण निर्माण होत आहे. तरी त्वरित प्रशासक नेमून गावक-यांना होणारा त्रास थांबवण्याची मागणी होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…
https://www.facebook.com/wanibahuguninews/