दीपक नवले यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार प्रदान

0

देवेंद्र खरवडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी: जैताई देवस्थान शिक्षण विभाग वणीयांच्या वतीने मामा क्षीरसागर स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात दीपक नवले यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून दलित मित्र मेघराज भंडारी हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात ‘कुंभारासारखा गुरू नाही रे जगात’ ही गुरुवंदना अपर्णा देशपांडे, प्रणिता पुंड, कल्पना देशपांडे यांनी सादर केले त्यानंतर जैताई देवस्थानचे सचिव माधव सरपटवार यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी प्रस्ताविकातून सादर केली.

उपक्रम शिक्षक दीपक नवले यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्राचार्य राम शेवाळकर स्मृती उत्कृष्ट पुरस्कार 2100 रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह देऊन अतिथीच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराप्रती आदरभाव व्यक्त करून नानासाहेबांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्या जीवनातील सगळ्यात मोठा पुरस्कार आहे अशा भावना व्यक्त केल्या.

प्रमुख अतिथी म्हणून मेघराजजी बोलताना म्हणाले की, सत्यनिष्ठ ज्ञाननिष्ठा, श्रमनिष्ठा, अहिंसा, सेवा या तत्वांना घेऊन मामांनी जीवनभर केलेले कार्य हे समाजासाठी दीपस्तंभ आहेत त्यांच्या कार्याचा वसा आपण चालवू असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषण करताना डॉ. चोपणे म्हणाले की, आचार्य कुल शिक्षणाचे मूलभूत उद्देश समाज परिवर्तन व प्रगती, समाजाचे सर्व प्रश्न सोडवू शकणारा माणूस निर्माण करणे हे आहे. ज्ञान निष्ठा, विद्यार्थी निष्ठा, समाज निष्ठा , या तीन निष्ठा पूर्ण करणारा प्रत्येक शिक्षक असावा. शिक्षणाचा उद्देश हा चांगला माणूस निर्माण करणे हा आहे. ते पूर्ण झाले की आपण आपल्या उद्दिष्टपर्यंत जाऊ असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे संचालन जैताई देवस्थानचे संचालक चंद्रकांत अणे यांनी केले. आभार गजानन कासावार यांनी मानले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.