महिला दिनानिमित्त मंगळवारी सुतारपुरा येथे विविध कार्यक्रम

व्याख्यान, सत्कार, स्नेहभोजन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सुतार समाज महिला मंच, वणी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार, दिनांक 10 मार्च 2026 रोजी महादेव मंदिर, सुतारपुरा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात व्याख्यान, सत्कार समारंभ, स्नेहभोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

Birthday

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीच्या महिला अध्यक्षा वंदना आवारी राहणार असून प्रमुख पाहुण्या म्हणून प्रियंका चौधरी (ए.पी.आय., पोलीस स्टेशन वणी) व मुस्कान सैय्यद (मुख्य क्षेत्रीय अधिकारी, TDRF) उपस्थित राहणार आहेत. वैद्य सुवर्णा चरपे “स्वयंप्रतिकारक रोगाशी लढताना” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान देतील.

यावेळी नगरसेविका आरती वांढरे, अर्चना झिलपे, अॅड. प्रतीक्षा देऊळकर यांच्यासह समाजातील होतकरू महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी 4 ते 6 वाजता स्नेहभोजन आणि सायंकाळी 7 वाजता “मम्मी स्पेशल” नृत्य व वेशभूषा स्पर्धा होणार आहे. हा कार्यक्रम अध्यक्ष मंगला झिलपे यांच्या मार्गदर्शनाखाली सुतार समाज महिला मंच, वणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments are closed.