आज काळाराम मंदिर येथे सुंदरकांड पाठाचे आयोजन

श्री हनुमान जन्मोत्सवात भक्तिरसाचा सोहळा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने वणी शहरात धार्मिक वातावरणात ‘संगीतमय सुंदरकांड पाठ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजेदरम्यान हा कार्यक्रम श्री काळाराम मंदिर समोर, रामपूरा वॉर्ड, जत्रा रोड येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार श्री. मनू महाराज तुगनायत व त्यांचा संच सुंदरकांडाचे सुमधुर सादरीकरण करणार असून, भक्तांना भक्तिरसाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’च्या घोषणांनी परिसर दुमदुमणार असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. रामपुरा वॉर्ड मित्र परिवार वणी यांनी सर्व नागरिकांना या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून भक्तिमय वातावरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Comments are closed.