बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील लाठी (बेसा) येथील रहिवासी कवडू पांडुरंग खोके (वय 40) यांनी आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 15 एप्रिल) पहाटे उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 4 ते 5 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. काही वेळानंतर ही बाब घरच्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ शिरपूर पोलीस स्टेशनला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील तपासासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. दरम्यान, कवडू खोके यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.



Comments are closed.