दारूच्या नशेत मुलावर पट्ट्याने हल्ला; वडिलांविरुद्ध गुन्हा

आईलाही शिवीगाळ; घराबाहेर जाण्याची धमकी

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथे दारूच्या नशेत असलेल्या वडिलांनी स्वतःच्या मुलावर पट्ट्याने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत फिर्यादी मुलगा (वय 21, रा. मारेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 17 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 8:30 वाजताच्या सुमारास तो कामावर असताना त्यांच्या आईचा फोन आला. वडील दारूच्या नशेत घरात शिवीगाळ करत कपडे बाहेर फेकत असल्याची माहिती मिळताच तो घरी आला.

घरी आल्यावर त्याचे वडील (वय 55) हे नशेत आईसोबत भांडण करत असल्याचे दिसून आले. यावेळी फिर्यादीने हस्तक्षेप केल्यावर आरोपीने कमरेचा पट्टा काढून त्याच्या डोक्यावर मारहाण केली.

पट्ट्याच्या लोखंडी बकलमुळे डोक्याला मार लागून जखम झाली. तसेच आरोपीने आई व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत घराबाहेर जाण्यास सांगितले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 118(1), 351(2), 352 व 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहेत.

 

Comments are closed.