घरफोडी प्रकरणातील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

9.30 लाखांचे दागिने हस्तगत, गुन्ह्यात 2 अल्पवयीन मुलांचाही सहभाग

विवेक तोटेवार, वणी: घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना यश आले असून या प्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यातील लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस ठाणे मारेंगाव येथे दाखल असलेल्या घरफोडी प्रकरणातील आरोपी नथु उर्फ नागू कुरकुटे (वय 30, रा. मोहदरी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यात एकूण 21 लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी काही दिवसांपासून फरार होता.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. 01 मे 2026 रोजी उमरखेड रोडवरील कोपरा फाटा परिसरात सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान पोलिसांनी चोरीस गेलेले सोने-चांदीचे दागिने हस्तगत केले असून त्यांची किंमत सुमारे 9,30,308 रुपये आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात दोन विधिसंघर्षित बालकांचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले असून त्यांच्याविरोधात पुढील कारवाई सुरू आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

Comments are closed.