WALK IN INTERVIEW – NBSA आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, वणी

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदासाठी 5 मे रोजी भरती

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील विठ्ठलवाडी परिसरातील एन.बी.एस.ए. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, वणी येथे विविध अध्यापक व शिक्षकेतर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) उमेदवारी मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिनांक 05/05/2026 रोजी सकाळी 9:00 वाजता महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9960877996 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

महाविद्यालयात इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, पर्शियन, अर्थशास्त्र, इतिहास व वाणिज्य या विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक (CHB) पदे भरली जाणार आहेत. संबंधित विषयात एम.ए. पदवी आवश्यक असून NET/SET/Ph.D धारकांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच शिक्षकेतर पदांमध्ये लिपिक, ग्रंथपाल सहाय्यक व शिपाई पदांसाठीही भरती होणार आहे. लिपिक पदासाठी बारावी/पदवीधर, MS-CIT व मराठी-इंग्रजी टायपिंग आवश्यक आहे. ग्रंथपाल सहाय्यक पदासाठी एम.लिब/बी.लिब तर शिपाई पदासाठी किमान दहावी/बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

Comments are closed.