अखेरची संधी-शेवटची बॅच; इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढवणारा कोर्स

21 दिवसांचा स्पोकन इंग्लिश फाउंडेशन कोर्स, 18 पासून शेवटच्या बॅचला सुरुवात

बहुगुणी डेस्क, वणी: विद्यार्थी, युवक तसेच नोकरी व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी वणी येथील स्पोकन इंग्लिश क्लासेसतर्फे 21 दिवसांचा बेसिक फाउंडेशन कोर्स आयोजित करण्यात आला आहे. या कोर्सला दि. 18 मे 2026 पासून सुरुवात होणार असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर कोर्स दि. 18 मे ते 7 जून 2026 या कालावधीत घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दोन बॅच ठेवण्यात आल्या असून, पहिली बॅच सकाळी 7.30 ते 10 आणि दुसरी बॅच सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होणार आहे. ही यावर्षीची शेवटची बॅच आहे. त्यामुळे आताच 7038204209 (सागर देविदास जाधव M.A. Eng., Eco., B.Ed.)  या क्रमांकावर संपर्क साधून आपली सीट बूक करा.

काय शिकणार कोर्समध्ये?
या 21 दिवसांच्या फाउंडेशन कोर्समध्ये इंग्रजीची भीती दूर करून विद्यार्थी व युवकांना आत्मविश्वासाने इंग्रजी बोलता यावे, यासाठी प्रत्यक्ष प्रॅक्टिकल पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच इंग्रजी भाषेची मजबूत पायाभरणी करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना बेसिक ते अॅडव्हान्स स्तरापर्यंत उपयुक्त ठरणारे ग्रामर शिकविले जाणार असून, दैनंदिन जीवनात सहज वापरता येईल अशा स्पोकन इंग्लिशचा सराव घेतला जाणार आहे. यामध्ये प्रश्नोत्तर सराव, योग्य वाक्यरचना, शब्दसंग्रह वाढविणे, उच्चार सुधारणा, इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित करणे तसेच आत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय डेली स्पीकिंग प्रॅक्टिस, कम्युनिकेशन स्किल्स, पिक्चर डिस्क्रिप्शन, ग्रुप डिस्कशन, स्टोरी टेलिंग, इंटरव्ह्यू प्रिपरेशन, स्टेज डेअरिंग आणि दैनंदिन संभाषणावर आधारित विविध उपक्रमही घेण्यात येणार आहेत.

कोर्ससाठी कोणतीही वयोमर्यादा नसून विद्यार्थी, गृहिणी, नोकरी करणारे तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती सहभागी होऊ शकतात. मर्यादित जागा उपलब्ध असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे क्लासेस K.V.C. Heights Building, न्यू महाराष्ट्र बँकेच्या वर, टागोर चौक, वणी येथे आयोजित करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी सागर देविदास जाधव (M.A. Eng., Eco., B.Ed.) यांच्याशी 7038204209 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.