से. पोस्टमास्टर वसंतराव काशीकर यांचे निधन

शांत, सेवाभावी व्यक्तिमत्त्व हरपल्याने परिसरात हळहळ

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील पोस्ट कॉलनी, नांदेपेरा रोड परिसरातील रहिवासी तथा पोस्टमास्तर पदावरून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक वसंतराव काशीकर यांचे गुरुवारी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. काशीकर हे नगर परिषद शाळा क्र. 5 जवळील पोस्ट कॉलनी परिसरात वास्तव्यास होते. अत्यंत शांत, मनमिळावू आणि सेवाभावी स्वभावामुळे त्यांची शहरात विशेष ओळख होती. पोस्ट खात्यात दीर्घकाळ प्रामाणिक सेवा बजावल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या निधनाने सामाजिक व परिचित वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार दि. 29 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार असून वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Birthday

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.