नवीन वागदरा येथील आनंदराव नागपुरे यांचे निधन

आज सकाळी करण्यात आले अंत्यसंस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील नवीन वागदरा येथील रहिवासी तथा कापूस पणन महासंघ, वणी येथील सेवानिवृत्त कर्मचारी आनंदराव महादेव नागपुरे (वय 79) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी दुपारी 3.45 वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या शांत, मनमिळावू व कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे त्यांनी समाजात आपला वेगळा ठसा उमटविला होता. कापूस पणन महासंघात सेवा बजावत असताना त्यांनी प्रामाणिकपणे कार्य केले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक बहीण तसेच आप्तस्वकीय असा परिवार आहे. प्रवीण आनंदराव नागपुरे व सचिन आनंदराव नागपुरे हे त्यांचे पुत्र होत. त्यांच्यावर शनिवारी सकाळी 10.00 वाजता नवीन वागदरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comments are closed.