चारगाव चौकीजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

मुलगी थोडक्यात बचावली, नियंत्रण सुटले अन् मृत्यू ओढवला;

विवेक तोटेवार, वणी: चारगाव चौैकी जवळ एका दुचाकीचा भीषण अपघाता झाला. आज गुरुवारी दिनांक 11 जून रोजी सकाळी सव्वा 9 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यात अपघातात दुचाकीचालक वडीलांचा मृत्यू झाला तर मागे बसलेली मुलगी बचावली आहे. बस थांबवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतकाचे नाव रविंद्र मालेकर (वय अंदाजे 48 रा. शेलू) असे आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्राप्त माहितीनुसार, रविंद्र मालेकर हे आज सकाळी 9 वाजता शेलूहून सकाळी चारगाव चौकी येथे मुलीला घेऊन गेले होते. दरम्यान कोरपना हून वणीच्या दिशेने येणारी बस त्यांच्यासमोरून निघून गेली. त्यामुळे बस पकडण्यासाठी रविंद्र हे बसच्या मागे गेले. दरम्यान चारगाव चौकी जवळील पेट्रोल पम्पजवळ दुचाकीचे नियंत्रण सुटले व रविद्र हे बसच्या मागच्या चाकात आले. हा अपघात इतका भीषण होता की रविंद्र यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सुदैवाने यात दुचाकीच्या मागे बसलेली मुलगी सुखरुप आहे. अपघात होताच चौकीवरील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. शिरपूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. ठाणेदार पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे शेलू गावात व परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे. (सदर बातमी प्राथमिक माहितीवरून करण्यात आली असून अधिकची माहिती येताच बातमी अपडेट करण्यात येईल)

Comments are closed.