वांजरीत अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; 60 बाटल्या जप्त

राहत्या घरातून अवैध विक्री; जप्त केला साठा

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील वांजरी गावात अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर वणी पोलिसांनी कारवाई करत 2,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 6 वाजता वांजरी येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान संदीप ज्ञानेश्वर मेश्राम (वय 34, रा. वांजरी, ता. वणी, जि. यवतमाळ) हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या देशी दारूची विक्री करताना आढळून आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पंचांसमक्ष घराची झडती घेतली असता एका कागदी बॉक्समध्ये ‘रुपेश संत्रा’ ब्रँडच्या देशी दारूच्या 90 एमएल क्षमतेच्या 60 प्लास्टिक बाटल्या मिळून आल्या. प्रत्येकी 40 रुपये किंमतीच्या या बाटल्यांची एकूण किंमत 2,400 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलीस हवालदार अविनाश वामनराव चिकराम यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अविनाश चिकराम करीत आहेत.

Comments are closed.