बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय जनता पक्षाने आगामी मारेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीला गती देत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवि बेलूरकर यांची मारेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांनी जारी केले आहे.
नियुक्तीपत्रात रवि बेलूरकर यांच्या पक्षनिष्ठेचा, संघटनात्मक कौशल्याचा आणि सामान्य कार्यकर्त्यांशी असलेल्या सुसंवादाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, बेलूरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर पक्ष अधिक बळकट होईल तसेच जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सोडवून पक्षाला निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील, असा पक्ष नेतृत्वाला पूर्ण विश्वास आहे.
आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून मारेगाव परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीकडूनही बेलूरकर यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या नियुक्तीबद्दल रवि बेलूरकर यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


Comments are closed.