वणी भाजपला नवी ओळख देणारे नेतृत्व – अॅड. निलेश चौधरी

सेवा, संघटन आणि विकासाचा 1 वर्षाचा प्रवास

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक वाटचालीत गेल्या 1 वर्षात एक नवे पर्व सुरू झाले आहे. सेवा, समर्पण, संघटन आणि विकास या चार सूत्रांना केंद्रस्थानी ठेवून शहराध्यक्ष अँड. निलेश माया महादेव चौधरी यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण केली आहे.
दि. 28 जून 2025 रोजी वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासातून अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चौधरी यांनी विविध समाजघटकांना पक्षाच्या प्रवाहात जोडण्याचे काम केले. युवा, महिला, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्व घटकांना स्थान देत सर्वसमावेशक कार्यकारिणीची घोषणा 21 जुलै 2025 रोजी केली. नियमित बैठका, प्रशिक्षण वर्ग आणि मोर्चांच्या माध्यमातून संघटनाला गती मिळाली.
त्यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठे राजकीय यश म्हणजे नगरपरिषद निवडणुकीतील प्रभावी नियोजन. बूथस्तरापासून शहरस्तरापर्यंत मजबूत यंत्रणा उभी करून मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क साधला. कार्यकर्त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे भाजपला मोठे यश मिळाले. पदग्रहण सोहळ्याचे यशस्वी आयोजन करून संघटनात्मक ताकद दाखवून दिली.
राजकारणासोबत समाजसेवेचा ध्यास घेत चौधरी यांनी वर्षभर विविध उपक्रम राबविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, महाआरोग्य शिबिर, नेत्र संजीवनी अभियान, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी यामुळे नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळाला. स्वच्छता मोहीम, विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचे निराकरण, वृक्षारोपण अभियान अशा उपक्रमांनी सामाजिक बांधिलकी जपली.

शिरपूर कावड यात्रा, पोळा उत्सव सजावट स्पर्धा, गणेशोत्सवातील “बाप्पा माझा” स्पर्धा, क्रांती दिन तिरंगा रॅली, योग दिन, आणीबाणीच्या 50 वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला. रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 5000 राख्या पाठविण्याचा उपक्रम, नमो युवा रन मॅरेथॉन, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा, व्यापारी संमेलन आणि महिला जनजागृती रॅली यामुळे नागरिकांशी संवाद वाढला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी मंत्री मदन येरावार, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे तसेच जिल्हा व प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.

दि. 28 जून 2025 ते 28 जून 2026 हा कालखंड वणी शहर भाजपसाठी संघटन विस्तार, जनसेवा आणि विकासाभिमुख कार्याचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. चौधरी यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे, जनतेशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या विचाराने प्रेरित होऊन वणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची पुढील वाटचाल अधिक प्रभावी ठरो, अशी अपेक्षा वणीकरांकडून व्यक्त होत आहे.

Comments are closed.