बहुगुणी डेस्क, वणी: प्रेक्षकांना रहस्य, थरार आणि अॅक्शनचा रोमांचक अनुभव देणारा बहुप्रतिक्षित “ओडीसी” हा चित्रपट आता वणीतील सुजाता थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ग्रीक महाकाव्य ‘ओडिसी’ वर आधारित हा सिनेमा जगप्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांनी डिरेक्ट केला आहे. दमदार कथानक, उत्कंठावर्धक घडामोडी, प्रभावी अभिनय आणि नेत्रदीपक दृश्यांनी सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा ठरत आहे. रहस्य आणि अॅक्शनची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट खास पर्वणी ठरणार आहे. सुजाता थिएटरमध्ये रोज दुपारी 12.00 वाजता आणि रात्री 9.00 वाजता असे दोन शो ठेवण्यात आले आहेत. तर दु. 3 व सं. 6 वाजता धमाल 4 हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
अत्याधुनिक साउंड सिस्टिम, मोठा स्क्रीन, आरामदायी आसन व्यवस्था आणि भव्य थिएटर वातावरणामुळे प्रेक्षकांना खराखुरा आनंद घेता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.
काय आहे ‘ओडीसी’ची कथा?
“ओडीसी” हा रहस्य, अॅक्शनने भरलेला पौराणिक महाकाव्यावर आधारीत चित्रपट आहे. ट्रॉयच्या महायुद्धानंतर इथाकाचा राजा ओडिसियस आपल्या पत्नी पेनेलोपे आणि मुलगा टेलिमॅकस यांच्याकडे परत येण्याच्या प्रयत्नात १० वर्षे समुद्रात भटकतो, अशी ही महाकाव्यात्मक कथा चित्रपटात साकारली जाणार आहे. ट्रॉयच्या युद्धानंतर ओडिसियस (मॅट डेमन) देवतांच्या क्रोधामुळे, समुद्री राक्षसांच्या हल्ल्यामुळे आणि जादूगारणींच्या जाळ्यात सापडून वर्षानुवर्षे भटकतो. त्याच्या घरात (इथाका) लोभी राजकुमार पेनेलोपेला (ऐन हैथवे) लग्न करण्यासाठी दबाव टाकतात आणि राज्य हडपण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे त्याचा मुलगा टेलिमॅकस (टॉम हॉलंड) वडिलांचा शोध घेत घरातील गोंधळाचा सामना करतो. प्रमुख पात्राचा प्रवास अनेक धोकादायक प्रसंग, थरारक संघर्ष आणि रहस्यमय घटनांनी भरलेला आहे. प्रत्येक प्रसंगासोबत उत्कंठा वाढत जाते आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना पुढे काय घडणार, याची उत्सुकता कायम राहते. दमदार अॅक्शन, भावनिक प्रसंग आणि उत्कंठावर्धक कथानकाचा उत्कृष्ट मेळ असल्याने “ओडीसी” हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.