“रघुपती राघव राजाराम”च्या गजरात काँग्रेसचे वणीत आंदोलन

देणगी निधीतील कथित गैरव्यवहाराविरोधात काँग्रेस आक्रमक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटी व देणगी निधीमध्ये कथित गैरव्यवहार आणि चोरी झाल्याच्या आरोपांच्या निषेधार्थ वणी तालुका काँग्रेस कमिटी व वणी शहर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 14 जुलै 2026 रोजी हनुमान मंदिर, आंबेडकर चौक, वणी येथे “रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन” आयोजित करण्यात आले. आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून संबंधित कथित प्रकरणातील दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली.

आंदोलनाची सुरुवात हनुमान मंदिरात श्रीराम नामाचे भजन व आरती करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी श्रीराम मंदिराच्या देणगी निधीतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. मंदिरांवरील जनतेच्या श्रद्धेचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलनाचे नेतृत्व विकेश पानघाटे, जय आबड, श्यामा दीदी तोटावार, सुरज पुल्लेवार, रोहित मालेकर, सुधीर खंडाळकर, मोरेश्वर वासेकर, अशोक चिकटे, राजू अंकतवार, फरीद शेख, डॉ. प्रेम मेश्राम, अनंत डुंबारे आणि पांडुरंग पंडिले यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आंदोलनाला संजय खाडे, प्रमोद वासेकर, ओम ठाकूर, वंदना आवारी, विवेक मांडवकर, करुणा कांबळे, प्रमोद लोणारे, वंदना धगडी, नीलिमा काळे, जयसिंग गोहोकार, सुरेश बन्सोड, प्रा. शंकर वऱ्हाटे, राजेंद्र कोरडे, जगदीश चौधरी, सचिन पिदूरकर, पुंडलिक गुंजेकर, रवींद्र होकम, राजू काळे, तेजराज बोढे, ज्ञानेश्वर येसेकर, संदेश शंभरकर, मारोती मोवाडे, अशोक नागभीडकर, प्रभाकर मंथनवार, मंगला झिलपे, सुरेखा वडीचार, प्रिया मडावी, मंदा सोनारखन, सविता गंधेवार, सविता रासेकर, कुंदन यातकेलीवर, संध्या रामगिरवार, वामन कुचणकर, विजय गौरकार, गिरीश सातपुते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वणी पोलीस स्टेशन येथे जाऊन संबंधित कथित प्रकरणातील दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करणारी लेखी तक्रार दाखल केली. यावेळी उपस्थितांनी श्रीराम मंदिराच्या देणगी निधीतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

Comments are closed.